महाराष्ट्र राज्य मंडळ / CBSE · ९ वी · मराठी कुमारभारती
ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Olympic Vartulancha Gof
Chapter summary, hard words and model exam answers for Class 9 Marathi.
Free online summary and notes (Class 9 Marathi). Read it here, no PDF download needed.
About the author
Bal J. Pandit (1929-2015) was a well known author and cricket commentator; his books include 'Pahile Shatak', 'Kumaranche Khel' and 'Cricketmadhil Navalkatha'.
Summary
लेखक ऑलिंपिक गावाकडे मोटारीने जात असताना त्यांना उंच स्तंभावर एक मोठा ध्वज फडकताना दिसतो. त्या ध्वजावर पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची पाच वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असतात.
On the way to the Olympic village the author sees a great flag on a tall pole; on its white field five interlocked rings in red, yellow, blue, green and black look like five friends linking hands in friendship.
ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि पांढरी पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. ध्वजावर 'सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस' हे ब्रीदवाक्य आहे, म्हणजे गतिमानता, उच्चता व तेजस्विता.
The five rings stand for the five continents and the white field for vast space; the motto 'Citius, Altius, Fortius' (Faster, Higher, Stronger) urges every athlete to be swifter, to reach higher and to build greater strength.
ध्वजस्तंभाजवळ एक मशाल सतत तेवत असते. हजारो खेळाडू व लाखो प्रेक्षक येतात. खेळाडूंच्या निवासासाठी इमारती, वसतिगृहे, उपाहारगृहे असलेले एक मोठे गावच वसवले जाते, त्याला 'ऑलिंपिक व्हिलेज' म्हणतात. पहिले व्हिलेज १९५६ मध्ये मेलबोर्न येथे वसले.
An inspiring torch burns by the pole; some five to six thousand athletes and seventy to eighty thousand spectators gather; a whole town with lodgings, hostels and huge dining halls, the 'Olympic Village', is built, an idea first put forward at Melbourne in 1956.
इ. स. पूर्व ७७६ मध्ये ग्रीसमध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद आहे. विजेत्यांना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव होई. ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाल्यावर इ. स. पूर्व ३९४ मध्ये सामने बंद पडले. पुढे १८९४ साली कुबर टीन या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने हे सामने पुन्हा सुरू केले; १८९६ पासून दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत होतात.
The first record of these games is from Greece in 776 BC, where winners were honoured with a garland of olive branches; with the decline of Greek power the games stopped in 394 BC. In 1894 the French expert Coubertin revived them at an Olympic Congress in France, and from 1896 they are held every four years in different countries.
क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद किंवा वर्णभेद नाही; सर्वांना समान संधी मिळते. एकवीस खेळांची तरतूद असून पुरुष व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. व्यवस्थेसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती असते आणि होणारा मोठा खर्च स्पर्धक देश उभा करतात.
Sport knows no caste, religion or colour; all get equal opportunity. There are twenty one sports, with separate events for men and women; an International Olympic Committee manages them and the large cost is borne by the participating countries.
अमेरिकेच्या जेसी ओवेन्सने १९३६ मध्ये बर्लिनला चार अजिंक्यपदे व नवे उच्चांक मिळवले. एमिल झेटोपेकने १९५२ मध्ये हेलसिंकीला नवे विक्रम केले व 'मानवी रेल्वे इंजिन' अशी ख्याती मिळवली. इथियोपियाच्या अबेबे बिकिलाने अनवाणी पायाने मॅरेथॉन जिंकली. फॅनी बँकर्सने १९४८ साली १०० व २०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले व ध्यानचंद यांचे नाव गाजले.
America's Jesse Owens won four titles with new records at Berlin in 1936; Emil Zatopek set new records in the 5,000 m and marathon at Helsinki in 1952 and earned the name 'Human Locomotive'; Ethiopia's Abebe Bikila won the marathon running barefoot; Fanny Blankers won the 100 m and 200 m in 1948; and India held the hockey title for many years with Dhyan Chand's fame spreading worldwide.
खेळाडू खेळत असताना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्यावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात आणि शेजारी तेवणारी ज्योत क्षुद्र विचारांचा अंधकार घालवते.
As athletes compete, the flag of valour and effort flies proudly; its five rings of the five continents proclaim equality and world brotherhood, while beside it a burning flame drives away the darkness of petty thoughts.
Hard words & meanings
| क्षितिज | दृष्टीच्या टप्प्यात आकाश व पृथ्वी एकत्र भासतात ती सीमारेषा |
| ब्रीदवाक्य | एखाद्या संस्थेचे वा कार्याचे ध्येय थोडक्यात सांगणारे वाक्य |
| पर्वणी | मोठ्या आनंदाचा वा लाभाचा क्वचित येणारा प्रसंग |
| बलसंवर्धन | शरीराचे बल व शक्ती वाढवण्याची क्रिया |
| पुनरुज्जीवन | थांबलेली वा लोप पावलेली गोष्ट नव्याने जिवंत करणे |
| अजिंक्यपद | स्पर्धेत सर्वोच्च ठरून मिळवलेले विजेतेपद |
| विश्वबंधुत्व | जगातील सर्व माणसे बांधव आहेत ही भावना |
| अनवाणी | पायात पादत्राणे न घालता, उघड्या पायाने |
Model exam answers, grammar & audio
You have read the summary. The board-ready model answers, grammar notes, one-touch audio and writing practice for this chapter are part of Lipi.
Sign in to unlockSee it, understand it, hear it read aloud, then write the exam answer with confidence, for a fraction of a tutor cost.